लोकसभा निवडणूक २०१९ नियम भंग करणाऱ्या प्रिंटर्सला सहा महिन्यांची शिक्षा उमेदवार, मुद्रणालयांच्या चालक मालकांनी सहकार्य करावे
अलिबाग, जि. रायगड, दि.22 (जिमाका)- :- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोणतेही मुद्रण साहित्य व फ्लेक्स लावताना निवडणूक काळामध्ये घ्यावयाच्या काळजीचे व कायद्यांचे पालन करणे अत्यंत आवश्यक असून त्याचे उल्लंघन करणाऱ्या प्रिंटर्सवर सहा महिन्याची शिक्षा होऊ शकते, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच सर्व संबंधितांनी या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचे कार्यात कायदेशीर तरतूदीचे पालन करुन निवडणूक कामाला सहकार्य करावे असे आवाहन रायगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांनी केले आहे. वरील कलमाच्या कोणत्याही उपबंधाचे उल्लंघन करणाऱ्यास सहा महिन्यांपर्यंत शिक्षा असू शकेल इतक्या कारावासाची किंवा दोन हजार रुपयाप र्यं त दंडाची अथवा या दोन्ही शिक्षेस पात्र ठरेल. त्यामुळे राजकीय पक्ष, निवडणूक लढविणारे उमेदवार व मुद्रणालयांच्या चालक मालकांनी यांची नोंद घ्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 19...