मानवी हक्कांबाबत जनजागृती आवश्यक -न्या.बी.सी.कांबळे
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.10 -मानवी हक्काचे संरक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.त्यामुळे मानवी हक्काची माहिती समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवणे आवश्यक आहे.त्यासाठी मानवी हक्का बाबत जनजागृती आवश्यक असल्याचे प्रतिपादन तदर्थ जिल्हा न्यायाधीश (1) बी.सी.कांबळे यांनी आज येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात मानवी हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीमती प्रेमलता जैतू, तहसिलदार एन.बी.लोखंडे, नायब तहसिलदार अण्णाप्पा कनशेट्टी, समाज कल्याण निरीक्षक अनिल मोरे, कारागृह निरीक्षक आबासाहेब पाटील तसेच शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. आपल्य...