स्वदेस फाउंडेशन तर्फे जागतिक हृदयरोग दिन साजरा

अलिबाग,दि.30 (जिमाका):- स्वदेस फाउंडेशनच्या डिजिटल स्वदेस उपक्रमांतर्गत दि.29 सप्टेंबर रोजी आरोग्य कार्यकर्ते, हृदयरोगी रुग्णांचा परिवार यांच्यासोबत “ जागतिक हृदय दिन ” साजरा करण्यात आला. यावेळी सुप्रसिद्ध पेडियाट्रिक कार्डियाक सर्जन डॉ.भरत दळवी यांनी हृदयरोगावर दूरदृष्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. डॉ.भरत दळवी हे ग्लेनमार्क कार्डियाक सेंटर, ब्रीच कॅंडी हॉस्पिटल, नानावटी हॉस्पिटल आणि रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर यांसारख्या अत्यंत प्रतिष्ठित रुग्णालयांमध्ये सल्लागार म्हणून काम करत आहेत. आरोग्य कार्यकर्त्यांनी जन्मजात हृदयरोग कसे ओळखायचे, हृदयरोगावर कुठे आणि कोणत्या प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत, उपचारानंतर कशा प्रकारे काळजी घ्यायची, याविषयीचे सखोल व सोप्या पद्धतीने मार्गदर्शन डॉ.दळवी यांनी केले व आरोग्य कार्यकर्त्यांच्या व पालकांच्या शंकांचे निरसन केले. रॉनी स्क्रूवाला व झरीना स्क्रूवाला यांच्या स्वदेसने फाउंडेशनने 2014 पासून आतापर्यंत हृदयविकाराचा त्रास असलेल्या 185 मुलांची यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे...