राज्य लोकसेवा आयोगामार्फत 2019 या वर्षातील परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर
नवी मुंबई, दि. 16 : राज्य लोकसेवा आयोगामार्फत 2019 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे , सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2018 जाहिरात नोव्हेंबर 2018 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मुख्य परीक्षा दिनांक 19 जानेवारी 2019 रोजी होणार आहे. राज्य सेवा परीक्षा 2019 जाहिरात डिसेंबर 2018 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पूर्व परीक्षा दिनांक 17 फेब्रुवारी 2019 रोजी होणार आहे. मुख्य परीक्षा दिनांक 13,14 व 15 जुलै 2019 रोजी होणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2019 जाहिरात जानेवारी 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पूर्व परीक्षा दिनांक 24 मार्च 2019 रोजी होणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2019 पेपर क्रमांक -1 मुख्य परीक्षा दिनांक 28 जुलै 2019 रोजी होणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2019 पेपर क्रमांक -2 पोलीस उप निरीक्षक मुख्य परीक्षा दिनांक 04 ऑगस्ट 201...