पत्रकार दिनानिमित्त आज चर्चासत्र


            अलिबाग, जि. रायगड, दि.15 (जिमाका)- राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त शुक्रवार दि.16 रोजी  जिल्हा माहिती कार्यालय, रायगड यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. ‘डिजीटल युगातील पत्रकारिताः आचारनिती आणि आव्हाने’ हा चर्चासत्राचा विषय असून यासंदर्भात जिल्हा सरकारी वकील ॲड. संतोष पवार हे मार्गदर्शन करणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. सदर कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात सकाळी 11 वाजता होणार आहे. तरी या कार्यक्रमास सर्व पत्रकार, माध्यमकर्मींनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान