Posts

Showing posts from April 5, 2026

रायगड जिल्ह्यात बाटली किंवा कॅनमध्ये पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

रायगड-अलिबाग,दि.०६(जिमाका):-  समाजमाध्यमावर पेट्रोल-डिझेल विक्रीमध्ये तुटवडा निर्माण होणार असल्याची प्रसारीत झालेल्या बातम्यांच्या अनुषंगाने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने पेट्रोलसारख्या ज्वलनशील पदार्थाच्या मुक्त विक्रीमुळे अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्य:स्थितीचा विचार करून पेट्रोल-डिझेल विक्रीबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यानुसार पेट्रोलियम नियम २००२ मधील तरतुदी विचारात घेता पेट्रोल किंवा डिझेल खुल्या प्लॉस्टिक बाटली किंवा अनधिकृत कंटेनरमध्ये पेट्रोल पंपावरून भरून देणे, विकणे नियमांविरुद्ध आणि बेकायदेशीर असल्याने जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी खालीलप्रमाणे आदेश दिले आहेत.  जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालक,मालक यांनी पेट्रोल, डिझेल हे केवळ वाहनाच्या इंधन टाकीतच वितरित करावे. कोणत्याही परिस्थितीत पेट्रोल, डिझेल खुले (कॅन, बाटली, डबा किंवा इतर कोणत्याही भांडयात) विक्री पुरवठा करू नये. पेट्रोल पंप परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवावी व विक्री नोंदी नियमित ठेवाव्यात.  अनाधिकृतप...

कॉल बेसिसवर भाडोत्री वाहन सेवा पुरवठा करण्याकरीता पात्र पुरवठादार,कंपन्यांनी दरपत्रक,कोटेशन सादर करावीत

    रायगड-अलिबाग,दि.०६(जिमाका):-  मा.बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (SMART) प्रकल्पांतर्गत जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजाकरीता कॉल बेसिसवर भाडोत्री वाहन सेवा पुरवठा करण्याकरीता प्रमुख, जिल्हा अंमलबजावणी कक्ष स्मार्ट, रायगड यांच्या कार्यालयात विहित प्रपत्रात दरपत्रक कार्यालयीन वेळेत ऑफलाईन पद्धतीने दि.१६ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ०२.०० वाजेपर्यंत सादर करावीत, असे आवाहन प्रमुख, जिल्हा अंमलबजावणी कक्ष स्मार्ट तथा प्रकल्प संचालक आत्मा रायगड वंदना शिंदे यांनी केले आहे. पुरवठादारांना पुरवठ्याच्या अटी व शर्तीचे दरपत्रक, मागणीपत्र तसेच दरपत्रकाचा विहित नमुना प्रपत्र विनामूल्य या कार्यालयात तसेच स्मार्ट प्रकल्पाच्या अधिकृत वेबसाईटवर ( https://www.smart-mh.org/ ) उपलब्ध करुन दिले जातील. पात्र पुरवठादार, कंपन्यांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन दरपत्रक, कोटेशन सादर करावीत. ०००००००