कॉल बेसिसवर भाडोत्री वाहन सेवा पुरवठा करण्याकरीता पात्र पुरवठादार,कंपन्यांनी दरपत्रक,कोटेशन सादर करावीत

 

 

रायगड-अलिबाग,दि.०६(जिमाका):- मा.बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (SMART) प्रकल्पांतर्गत जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजाकरीता कॉल बेसिसवर भाडोत्री वाहन सेवा पुरवठा करण्याकरीता प्रमुख, जिल्हा अंमलबजावणी कक्ष स्मार्ट, रायगड यांच्या कार्यालयात विहित प्रपत्रात दरपत्रक कार्यालयीन वेळेत ऑफलाईन पद्धतीने दि.१६ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ०२.०० वाजेपर्यंत सादर करावीत, असे आवाहन प्रमुख, जिल्हा अंमलबजावणी कक्ष स्मार्ट तथा प्रकल्प संचालक आत्मा रायगड वंदना शिंदे यांनी केले आहे.

पुरवठादारांना पुरवठ्याच्या अटी व शर्तीचे दरपत्रक, मागणीपत्र तसेच दरपत्रकाचा विहित नमुना प्रपत्र विनामूल्य या कार्यालयात तसेच स्मार्ट प्रकल्पाच्या अधिकृत वेबसाईटवर (https://www.smart-mh.org/) उपलब्ध करुन दिले जातील. पात्र पुरवठादार, कंपन्यांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन दरपत्रक, कोटेशन सादर करावीत.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन