स्वामित्व योजनेंतर्गत गावांची सनद वाटप 2 लाख 86 हजार 550 रुपये सनद वसूल
रायगड,दि.27(जिमाका):- दि.26 जानेवारी 2024 रोजी भारतीय 75 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून स्वामित्व योजनेंतर्गत गावठाण सर्वे झालेल्या अलिबाग तालुक्यातील मौजे-परहुरपाडा, भाकरवड, मान तर्फे झिराड, खंडाळे, लोणारे व नारंगी या गावांची सनद वाटप करण्यात आली. उप अधीक्षक भूमी अभिलेख अलिबाग भोलाशंकर कोकने व शिरस्तेदार बाळासाहेब दुरगुडे यांनी विशेष लक्ष देऊन एकूण रक्कम 2 लाख 86 हजार 550 रुपये सनद वसूल केली आहे. ००००००