राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत मैत्री प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी अर्ज सादर करावेत

 

 

रायगड,दि.25(जिमाका):- केंद्रशासनाकडून प्राप्त मार्गदर्शक सुचनांच्या अनुषंगाने राज्यातील ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार यांना राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत मैत्री ( Multipurpose Artificial Insemination Worker in Rural India (MAITRI) म्हणून प्रशिक्षण द्यावयाचे आहे.  याकरिता जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत पशुधन विकास अधिकारी (विस्तार)पंचायत समिती यांच्याकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन,रायगड-अलिबाग डॉ.सचिन देशपांडे  व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद रायगड डॉ.शामराव कदम यांनी केले आहे.

 प्रशिक्षित व्यक्तीची कृत्रिम रेतन व अनुषंगीक कार्य करण्यासाठी नियुक्ती करावयाची आहे.  जेणेकरुन राज्यातील गायी-म्हशींमध्ये कृत्रिम रेतनाची व्याप्ती वाढेल व ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार यांना रोजगार उपलब्ध होईल. तसेच त्या योगे दुग्धउत्पादनात वाढ होवून शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट होण्यास मदत होईल. हा प्रशिक्षण कार्यक्रम 3 महिने कालावधीचा असून यामध्ये 1 महिना क्लासरुम ट्रेनिंग व 2 महिने प्रॅक्टीकल ट्रेनिंगचा समावेश राहील. क्लासरुम ट्रेनिंग पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात येईल व प्रॅक्टीकल ट्रेनिंग जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 किंवा तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकीत्सालय किंवा जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकीत्सालय या ठिकाणी घेण्यात येईल.

या प्रशिक्षण घेण्यासाठी ईच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जदार हा किमान 12 वी उत्तीर्ण झालेला असावात्याचे वय 18 ते 35 वर्ष असावे. अर्जाचा नमुना पशुधन विकास अधिकारी (विस्तार)पंचायत समिती यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेमध्ये उपलब्ध होईल. रायगड जिल्ह्याकरिता एकूण 94  उमेदवारांची या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येईल.

००००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत