युवकांनी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा-जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे जिल्हयामध्ये 14 ठिकाणी उद्धाटन कार्यक्रम उत्साहात संपन्न

रायगड (जिमाका) , दि. 19 :- आगामी काळात जिल्ह्यात वाढत्या उद्योग क्षेत्रामुळे रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होणार आहेत. यासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या कौशल्य विकास प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी केले. महाराष्ट्र शासनामार्फत जिल्हयातील 14 गावांमध्ये प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आले आहे. राज्यातील या केंद्रांचे उद्धाटन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे झाले. यनिमित्ताने अलिबाग तालुक्यातील चेंढरे ग्रामपंचायत केंद्र येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थी व युवक यांच्याशी सवांद साधताना डॉ . म्हसे बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण , तहसिलदार विवेक पाटील , जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती अमिता पवार , शिक्षणाधिकारी श्रीमती पुनिता गुरव , जिल्हा माहिती अधिकारी मनिषा...