जात प्रमाणपत्र पडताळणी त्रुटींच्या पूर्ततेसाठी शिबिराचे आयोजन अर्जदारांनी शिबिराचा लाभ घ्यावा,

 

 

रायगड(जिमाका)दि.19:-शैक्षणिक, सेवा, निवडणूक व इतर प्रयोजनार्थ सादर जात वैधता प्रमाणपत्र प्रस्तावांच्या अनुषंगाने दि.15 ते दि.31 ऑक्टोबर 2023 या कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत राज्यात विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.

त्यानुषंगाने अनु. जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान किंवा तंत्रनिकेतन (डिप्लोमा इंजिनिअरींग) या वर्गात शिकत असलेले विद्यार्थी, शासकीय/निमशासकीय सेवेतील कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणूकीत निवडून आलेले उमेदवार, इ. अर्जदारांनी दि. 30 सप्टेंबर 2023 पूर्वी समितीस दाखल केलेल्या अर्जांच्या बाबतीत ज्या अर्जदारांना अद्याप जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाही, अशा अर्जदारांसाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय,1402 अ,प्लॉट नं. 9,स.नं. 76/ब, सेंट मेरीज् कॉन्व्हेंट,स्कूल मागे, चेंढरे, अलिबाग येथे गुरुवार, दि.26 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता जात प्रमाणपत्राची पडताळणी त्रुटीपूर्ततेसाठी शिबिर आयोजित करण्यात आले असून अर्जदारांनी या  शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, रायगड उपायुक्त तथा सदस्य विशाल नाईक यांनी केले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान