जास्तीत जास्त गृहनिर्माण संस्थांनी मानीव अभिहस्तांतरण मोहिमेचा लाभ घ्यावा
अलिबाग,जि.रायगड दि.24 (जिमाका):- रायगड जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भाग मिळून एकूण 4 हजार 75 गृहनिर्माण संस्था असून या संस्थांपैकी विकासक, बिल्डर, जागामालक यांच्या असहकार्यामुळे संस्थांचे अभिहस्तांतरण खूपच अल्प प्रमाणात झालेले आहे. वास्तविक पहाता सहकारी संस्था नोंदणी झाल्यानंतर 4 महिन्यात विकासकानी संस्थेच्या इमारतीचे अभिहस्तांतरण करुन देण्याची जबाबदारी विकासक यांची असूनदेखील विकासक यांनी या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले असल्यामुळे गृहनिर्माण संस्था अभिहस्तांतरणापासून वंचित राहिलेल्या आहेत. शासनाने या बाबतीत इमारतीचे मानीव अभिहस्तांतरण करण्यासाठी मोलाचा वाटा उचलून विकासक यांना बाजूला ठेवून गृहनिर्माण संस्थांना मानीव अभिहस्तांतरण करण्याचा मार्ग मोकळा केलेला आहे. शासन अधिसूचना क्रमांक 129 दिनांक 27 सप्टेंबर 2010 तसेच शासन निर्णय क्रमांक माहस-2008/प्र.क्र.24/भाग-2/दुवपू-2 दिनांक 25 फेब्रुवारी 2011 अन्वये महाराष्ट्र मालकी हक्काच्या सदनिकाबाबत अधिनियम 1963 मध्ये दिनांक 25 फेब्रु...