पेट शॉप व डॉग ब्रीडिंग सेंटर यांना महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळामार्फत नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करुन घेणे बंधनकारक

 

अलिबाग,जि.रायगड दि.22 (जिमाका) :- महसूल व वन आपत्ती व्यवस्थापन मदत पुनर्वसन विभागाच्या दि.31 मे 2020 च्या शासन निर्णयानुसार निर्बंध शिथिल करणे व टाळेबंदी टप्म्याटप्प्याने उठविण्याच्या अनुषंगाने माहे-ऑगस्ट 2020 मध्ये सर्व पेट शॉप व डॉग ब्रीडिंग सेंटर यांना महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळामार्फत नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करुन घेणे आवश्यक होते. परंतु अद्यापही नोंदणी न करताच अजूनही काही ठिकाणी पेट शॉप व व डॉग ब्रीडिंग सेंटर सुरूच ठेवल्याचे निदर्शनास आले आहे.

            संबंधित पेट शॉप व व डॉग ब्रीडिंग सेंटर यांच्या मालकांनी तात्काळ प्राणी कल्याण मंडळाकडे नोंदणी करूनच दुकाने सुरु ठेवावीत, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त, पशुसंवर्धन महाराष्ट्र तथा सदस्य संचिव महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळ यांनी महानगरपालिका,स्थानिक संस्था, पोलीस यंत्रणेसह इतर सर्व संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.  तसेच जिल्ह्यात अनोंदणीकृत असलेल्या पेट शॉप व व डॉग ब्रीडिंग सेंटर तात्काळ बंद करण्याबाबत कार्यवाही करावी, असे निर्देश दिले आहेत. त्यानुसार संबंधित पेट शॉप व डॉग ब्रीडिंग सेंटर यांनी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, अलिबाग तथा सदस्य, जिल्हा प्रतिक्लेश प्रतिबंध सोसायटी डॉ.सुभाष मस्के यांच्याकडे तात्काळ संपर्क साधावा, नोंदणीकरिता आवश्यक असलेली माहिती व विहित अर्ज उपलब्ध करून घ्यावी,अतिरिक्त आयुक्त, पशुसंवर्धन महाराष्ट्र तथा सदस्य सचिव,महाराष्ट्र प्राणी कल्याण, औंध पुणे यांच्याकडे नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, रायगड-अलिबाग डॉ.सुभाष मस्के यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज