रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रामध्ये मनाई आदेश जारी
रायगड,दि.31(जिमाका):- रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रामध्ये खालापूर, खोपोली, रसायनी, रोहा, माणगांव, महाड, नागोठणे, अलिबाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर औद्योगिक कारखाने असून औद्योगिक कंपन्यांमध्ये कामगार संघटनांकडून आपल्या विविध मागण्यांसाठी अचानक संप व आंदोलन पुकारण्यात येत असतात. त्यामुळे अनेक वेळा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतो. अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत लोकसभा निवडणूक-2024 च्या मतदानाची मतमोजणी दि.04 जून 2024 रोजी होणार आहे. महाड तालुका पोलीस ठाणे हद्दीत दि.05 जून 2024 व दि.06 जून 2024 रोजी किल्ले रायगड येथे शिवराज्यभिषेक सोहळा पार पडणार आहे. पेण पोलीस ठाणे हद्दीत शेडीशी ग्रामपंचायत येथी क्लिच ड्रग्ज (इंडिया) लि. या कंपनीच्या आरेरावीबाबत निवेदन देवूनसुध्दा अद्यापपर्यंत कोणतीच कारवाई न झाल्याने सरपंच ग्रामपंचायत शेडाशी व ग्रामस्थ शेडाशी हे दि.07 जून 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषणास बसणार आहेत. वडखळ पोलीस ठाणे हद्दीत ज्येष्ठ पत्रकार रमेश नामदेव देवरुखकर, मुक्त पत्रकार न्युज महाराष्ट्र हे जे.एस.डब्ल्यू. कंपनी हेतुपरस्परपणे हलगर्जी करत असल्याचे विरोधा...