रस्ता सुरक्षा पंधरवडा आपल्या व परिवाराच्या सुरक्षेसाठी वाहतूक नियमांचे पालन आवश्यक ---जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले
रस्ता सुरक्षा पंधरवडा आपल्या व परिवाराच्या सुरक्षेसाठी वाहतूक नियमांचे पालन आवश्यक ---जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले अलिबाग दि.9 (जिमाका) ) जिल्ह्यात दि. 9 ते 23 जानेवारी 2017 या कालावधीत 28 वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा पंधरवडा व अभियान राबविण्यात येणार आहे. यात जिल्ह्यातील वाहन चालकांनी वाहतुकींच्या नियमांचे पालन करुन आपली व आपल्या परिवाराची सुरक्षा जपावी असे आवाहन, जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयात या पंधरवड्याचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर, अपर पोलीस अधिक्षक संजय पाटील, उ प प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण राजेंद्र मदने, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर, आपत्ती व्यव...