जंतापासून मुक्त.. होतील मुले सशक्त; 10 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम
अलिबाग,दि.07(जिमाका):- जिल्ह्यातील एक वर्ष ते 19 वर्ष वयोगटातील मुलांना व मुलींना सोमवार, दि.10 ऑक्टोबर 2022 रोजी जंतनाशक गोळ्या नि:शुल्क देण्यात येणार आहेत. या गोळ्या सर्व मुलामुलींना अंगणवाडी व शाळा स्तरावर उपलब्ध असतील. या गोळ्या चावून किंवा लहान मुलांना पाण्यामध्ये विरघळवून देणे आवश्यक आहे, असे जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी कळविले आहे. जंतनाशक गोळी खाल्ल्याने रक्तक्षय कमी होतो, बालक आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे शाळेतील उपस्थिती वाढते, मुले क्रियाशील बनतात व मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढते, आरोग्य चांगले राहते, अल्बेडझोल च्या एका गोळीमुळे जंताचा नाश होण्यास मदत होते, असे लाभ होतात. ग्रामीण भागामध्ये एकूण 4 लाख 60 हजार 1 ते 19 वर्ष वयोगटातील मुलामुलींना या गोळ्या सर्व शाळा व अंगणवाडीच्या ठिकाणी दि.10 ऑक्टोबर 2022 रोजी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याकरिता 4 लाख 70 हजार अल्बेडॅझोल गोळ्या ग्रामीण भागात वितरीत करण्यात आलेल्या आहेत. ग्रामीण भागातील 3 हजार 468 अंगणवाडी केंद्र, 3 हजार 92 शाळा तसेच 758 इतर शैक्षणिक संस्थांमधून झील गोळ्या दे...