मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे समाज कल्याण कार्यालयाकडून विद्यार्थ्यांना आवाहन

 

अलिबाग,दि.03 (जिमाका):- सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता देण्यात येणाऱ्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी चालू शैक्षणिक वर्ष 2022-23 करिता नवीन आणि नूतनीकरणासाठी अर्ज करता येणार आहे. https://mahadbtmahait.gov.in/Home/Index या लिंकच्या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे.

सन 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून महाडीबीटी पोर्टल या प्रणालीद्वारे भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, राज्य शासनाच्या शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना, राजर्षी शाहू महाराज मॅट्रिकोत्तर गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकत असलेल्या अनुसूचित जातीच्या मुलामुलींना निर्वाह भत्ता इत्यादी योजना राबविण्यात येतात. या शैक्षणिक वर्षापासून महाडीबीटी पोर्टलवरून प्रामुख्याने भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती तसेच राज्य शासनाच्या शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत प्रतिवर्षीची अर्ज संख्या लक्षात घेता हे अर्ज विहित वेळेत निकाली काढण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे.

कनिष्ठ महाविद्यालयातील शिष्यवृत्तीसाठी प्राप्त झालेले नवीन अर्ज दि.8 ऑक्टोबर 2022 पर्यंत संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी ऑनलाईन अग्रेषित करणे आवश्यक आहे तर संबंधित जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्तांनी प्राप्त झालेले अर्ज मंजूर करण्याची कार्यवाही दि.15 ऑक्टोबर 2022 पर्यंत करणे आवश्यक आहे.

तरी रायगड जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना/विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्याचे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत