प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत कृत्रिम भित्तिका स्थापनेबाबत अलिबाग व मुरुड येथे कार्यक्रम संपन्न
अलिबाग (जिमाका), दि. 11 :- महाराष्ट्रातील 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे. त्यापैकी रायगड जिल्ह्याला 122 किलोमीटर लांबीची सागरी किनारपट्टी लाभलेली आहे. राज्यातील मासेमारी, मत्स्य व्यवस्थापन व मत्स्य प्रजातींचे संरक्षण ही काळाची गरज असून त्या दृष्टीने कृत्रिक भित्तीकांची पाखरण करणे हा एक प्रभावी उपाय वाटतो. प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत कृत्रिम भित्तिका (Artificial Reef) स्थापनेबाबत 6 ऑगस्ट 2023 रोजी अलिबाग व मुरुड तालुका येथे व 7 ऑगस्ट 2023 रोजी श्रीवर्धन येथे कृत्रिम भित्तीका उभारण्यासाठी मच्छिमारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाला वरील तालुक्यातील नौका मालक, तांडेल, खलाशी व संस्था पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. तसेच मच्छिमारांना कृत्रिम भित्तिकांची उभारणी करण्यासाठी समुद्रातील योग्य जागा निवड करण्यासाठी या कार्यक्रमांमुळे सुकर जाईल, असे जाणवले. कारण त्यांनी कार्यक्रमात अनेक प्रश्न विचारुन कृत्रिम भित्तिका (Artificial Reef) या शास्त्रीय संकल्...