बाल शक्ती पुरस्कार व बालकल्याण पुरस्कारांसाठी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज मागवले


 

अलिबाग(जिमाका),दि.11 :- केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार व बालकल्याण पुरस्कार दिला जातो. बालशक्ती पुरस्कार सन 2024 करिता केंद्र शासनाने अर्ज मागविलेले आहेत. सदरचे अर्ज हे www.awards.gov.in ह्या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. सदर पुरस्कारांची माहिती सदरच्या संकेतस्थ्ळावर देण्यात आलेली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत दिनांक 31.08.2023 पर्यंत आहे.

बाल शक्ती पुरस्कार हा ज्या वय 5 पेक्षा अधिक व 18 वर्षापर्यंतच्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. त्यांना हा पुरस्कार दिला जातो.

बालकल्याण पुरस्कार (वैयक्तिक पुरस्कार) हा मुलांच्या विकास, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतून किमान 7 वर्षे काम करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो.

बालकल्याण पुरस्कार (संस्था स्तरावर) हा बालकल्याण क्षेत्रात अपवादात्म्म कार्य करणाऱ्या संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. संस्था पूर्णत: शासनाच्या निधीवर अवलंबून नसावी. बालकल्याण क्षेत्रात किमान 10 वर्ष सातत्य् पूर्ण उत्कृष्ट् कार्य करणारी असावी. असे राहूल मोरे, उप आयुक्त् (बालविकास) महिला व बाल विकास आयुक्तालय, महाराष्ट्र  राज्य, पुणे यांनी कळविले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज