जावळी ता.माणगाव येथे शैक्षणिक वर्षे 2019-20 करिता मोफत प्रवेश
अलिबाग, जि. रायगड, दि.7 (जिमाका)- सामाजिक न्याय व दि.विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा जावळी ता.माणगाव येथे शैक्षणिक वर्षे 2019-20 करिता इयत्ता 6 वी ते 9 वी च्या विद्यार्थ्याकरिता मोफत प्रवेश दिला जात आहे. या शाळेमध्ये विद्यार्थी प्रवेशाकरिता पुढीलप्रमाणे आरक्षण आहे. अनुसूचित जाती 80 टक्के, अनुसूचित जमाती 10 टक्के, अपंग प्रवर्ग 3 टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमाती 5 टक्के, विशेष मागास प्रवर्ग 2 टक्के. शासकीय निवासी शाळेची वैशिष्टये पुढीलप्रमाणे- शाळा विभाग व निवासकरिता स्वतंत्र इमारती. शासनामार्फत विनामूल्य राहण्याची, जेवाणाची सोय. विनामूल्य गणवेश व शैक्षणिक साहित्य आणि निवासी साहित्य. सुसज्य ग्रंथालय,प्रयोगशाळा व संगणक कक्ष, भव्य खेळाचे मैदान व क्रीडा साहित्य, डिजिटल स्कूल,म्युझिक सिस्टीम व दुरदर्शन संच. कार्यालयात उपलब्ध् प्रवेश अर्ज विहित नमुन्यात पुढील का...