सैनिकांच्या पाल्यांसाठी नवेनगर येथे वसतिगृह



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.3-  सैनिकी मुलांचे वसतिगृह नवेनगर, महाड येथे युद्धविधवांच्या पाल्यांना विनाशुल्क तर माजी सैनिक, विधवा, आजी/ माजी सैनिकांचे पाल्य  व अन्य नागरिकांच्या पाल्यांना  वाजवी दरात भोजन शुल्क आकारुन  प्रवेश दिला जातो. शैक्षणिक वर्ष 2019-20 करीता प्रवेश अर्ज  मागविण्यात आले आहेत. हे अर्ज वस्तिगृह अधिक्षकांकडे उपलब्ध आहेत. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी केले आहे. प्रवेशासाठी अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत  15 जुलै पर्यंत असून अधिक माहिती साठी मुलांचे वसतिगृह नवेनगर, महाड येथे (दूरध्वनी-02145-225451) संपर्क साधावा.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान