शासकीय योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होणे आवश्यक -- केंद्रीय मंत्री अनंत गीते
शासकीय योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होणे आवश्यक -- केंद्रीय मंत्री अनंत गीते अलिबाग, दि. 16 (जिमाका) :- जनकल्याणासाठी केंद्र शासनामार्फत अर्थसहाय्य असलेल्या अनेक योजना जिल्हयात राबविण्यात येत आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन योजना अधिकाधिक लाभधारकांपर्यंत पोहोचवाव्यात असे निर्देश केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते यांनी आज येथे दिले. केंद्र पुरस्कृत योजनांतर्गत कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची (दिशा) बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. बैठकीस पंचायत समितीत्यांचे नवनिर्वाचित सभापती,उपसभा...