किमान आधारभूत किंमत धान खरेदी योजनेंतर्गत धानखरेदीदार संस्थांमार्फत 38 खरेदी केंद्रावर धानाची (भाताची) खरेदी करता येणार
रायगड , दि.01 ( जिमाका):- किमान आधारभूत किंमत धान खरेदी योजनेंतर्गत दि.महाराष्ट्र स्टेट को-ऑप मार्केटिंग फेडरेशन मुंबई यां च्या मार्फत जिल्हा पणन अधिकारी , रायगड यांच्या अखत्यारीत असलेल्या धानखरेदीदार संस्थांमार्फत 38 खरेदी केंद्रावर खरीप व रब्बी पणन हंगाम 2023-2024 करिता धानाची (भाताची) खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे यांनी दिली आहे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्याकडील दि.9 नोव्हेंबर 2023 शासन निर्णयान्वये भात खरेदीचा धान-खरीप पणन हंगाम कालावधी दि.9 नोव्हेंबर 2023 ते दि. 31 जानेवारी 2024, तर भरड धान्य खरीप पणन हंगाम कालावधी दि.9 डिसेंबर 2023 ते दि. 31 जानेवारी 2024 असा असेल. तर रब्बी/उन्हाळी हंगाम केंद्र शासनाकडून प्राप्त सूचनांनुसार राहील . भात खरेदीच्या वेळी शेतकऱ्यांनी आपल्याकडील जमिनीबाबतचा 7 / 12 चा उता ऱ्या ...