किमान आधारभूत किंमत धान खरेदी योजनेंतर्गत धानखरेदीदार संस्थांमार्फत 38 खरेदी केंद्रावर धानाची (भाताची) खरेदी करता येणार


 

रायगड,दि.01 (जिमाका):- किमान आधारभूत किंमत धान खरेदी योजनेंतर्गत दि.महाराष्ट्र स्टेट को-ऑप मार्केटिंग फेडरेशन मुंबई यांच्या मार्फत जिल्हा पणन अधिकारी, रायगड यांच्या अखत्यारीत असलेल्या धानखरेदीदार संस्थांमार्फत 38 खरेदी केंद्रावर खरीप व रब्बी पणन हंगाम 2023-2024 करिता  धानाची (भाताची) खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे यांनी दिली आहे.

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्याकडील दि.9 नोव्हेंबर 2023 शासन निर्णयान्वये भात खरेदीचा धान-खरीप पणन हंगाम कालावधी दि.9 नोव्हेंबर 2023 ते दि.31 जानेवारी 2024, तर भरड धान्य खरीप पणन हंगाम कालावधी दि.9 डिसेंबर 2023 ते दि.31 जानेवारी 2024  असा असेल. तर रब्बी/उन्हाळी हंगाम केंद्र शासनाकडून प्राप्त सूचनांनुसार राहील.

भात खरेदीच्या वेळी शेतकऱ्यांनी आपल्याकडील जमिनीबाबतचा 7/12 चा उताऱ्याची व गाव नमुना 8(अ) ची छायाकिंतप्रत खरेदी केंद्रावर धान विक्रीकरिता आणणे आवश्यक आहे. या उताऱ्यातील धान्य व धानाखालील क्षेत्र पाहून धान/भरडधान्य खरेदी करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या 7/12 उतारानुसार पीकाखालील क्षेत्र,या वर्षीची पीक परिस्थिती (पैसेवारी), पीकाचे सरासरी उत्पादन या सर्व बाबी विचारात घेऊनधान/भरडधान्य खरेदी करण्यात येईल.

धानाची खरेदी ही ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने संबधित शेतकऱ्यांची नोंदणी करणे आवश्यक राहील. याकरिता खरेदी केंद्रावर भात ‍विक्रीकरिता आणताना प्रत्येक शेतकऱ्यांनी सोबत आपल्या आधारकार्डाची तसेच बँकेच्या पासबुक आणणे आवश्यक आहे. तसेच रोज सायंकाळी खरेदी  केंद्र  बंद झाल्यानंतर खरेदी केंद्रांवर आणलेलेपरंतु खरेदी न  झालेले धान/ भरडधान्य सांभाळण्याची जबाबदारी संबधित शेतकऱ्यांचीच राहील.

धानाच्या आधारभूत किंमती पुढीलप्रमाणे:

   भात सर्वसाधारण (एफ.ए.क्यू.)-हजार 183 रुपये प्रति क्विंटल व शेतकऱ्यांना हजार 183 रूपये प्रति क्विंटल रक्कम अदा करण्यात येईल.   भात (अ ग्रेड)- हजार 203  प्रति क्विंटल व शेतकऱ्यांना हजार 203  रूपये प्रति क्विंटल रक्कम अदा करण्यात येईल.

भरडधान्य-ज्वारी (संकरित)- 3 हजार 180  प्रति क्विंटल व शेतकऱ्यांना हजार 180,  ज्वारी (मालदांडी)- 3 हजार 225  प्रति क्विंटल व शेतकऱ्यांना हजार 225,   बाजरी- 2 हजार 500  प्रति क्विंटल व शेतकऱ्यांना हजार 500, मका- 2 हजार 90  प्रति क्विंटल व शेतकऱ्यांना हजार 90,    रागी- 3 हजार 846  प्रति क्विंटल व शेतकऱ्यांना हजार 846.    

आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत केंद्र शासनाने विहित केलेल्या विनिर्देशात बसणारे FAQ दर्जाचेचे धार,भरडधान्य खरेदी केले जाईल. केंद्र शासनाने विहित केलेल्या प्रमाणापेक्षा आर्द्रता जास्त आढळल्यास धान/भरडधान्य खरेदी करण्यात येणार नाही. कोणत्याही परीस्थितीत जास्त ओलसर किंवा बुरशीयुक्त धान/भरडधान्य खरेदी करु नये. केवळ शेतकऱ्यांकडून उत्पादित झालेले नवे धान/भरडधान्य खरेदी केले जाईल याची अभिकर्ता संस्थांनी विशेष खबरदारी घ्यावी.

भरडधान्य स्वच्छ व कोरडे असून ते विक्री योग्य (मार्केटेबलअसल्याची खातरजमा अभिकर्त्यांनी केल्यावरच भाताची खरेदी करण्यात येईल.  धान खरेदी करताना धान स्वच्छ कोरडे असावे.

आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शासनाने निर्धारीत केलेल्या धानाच्या ‍आधारभूत किंमती, दर्जाखरेदी केंद्र व खरेदी केंद्रास जोडण्यात आलेली गावे दर्शविणारे फलक सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती, ग्रामपंचायततहसिल कार्यालयपंचायत समिती कार्यालय इत्यादी ठिकाणी त्यांच्या नोटीस बोर्डवर दर्शनी भागावर प्रसिद्ध करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. केवळ शेतकऱ्यांकडून उत्पादीत झालेले नवे धान/भरडधान्याची खरेदी करण्यात येईल.

खरेदी केलेल्या धान/भरडधान्याची देय रक्कम शेतकऱ्यांना अदा करताना ऑनलाईन पध्दतीने प्रदान करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. ही रक्कम कोणत्याही परिस्थितीत धान भरडधान्य खरेदी केलेल्या दिवसापासून पुढील 2 दिवसांपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली पाहिजे, अशा शासनाच्या सूचना आहेत.

भात खरेदी केंद्राची ठिकाणे व त्यास जोडलेल्या गावांची माहिती जिल्हा पणन अधिकारी रायगडसंबधित तहसिलदार / गटविकास अधिकारी, पंचायत समिती तसेच उप अभिकर्ता म्हणून काम करणाऱ्या सहकारी संस्था/ खरेदी विक्री संघ/ सहकाी भात गिरणी यांच्याकडे उपलब्ध राहील.

अलिबाग तालुक्यातील शिरवली येथील भुवनेश्वर सहकारी भात गिरणी लि., नांगरवाडी मालाडे येथील नवजीवन शेती अभिनव सेवा सह.संस्था लि., रामराज येथील विरेश्वर शेतकरी लाभार्थी सामाईक संयुक्त शेती सहकारी संस्था लि., चोंढी येथील किहीम विभाग सहकारी भात गिरणी लि., रेवदंडा आणि बोर्ली मांडला येथील दत्तकृपा भाजीपाला सह.संस्था मर्या.

 पेण तालुक्यातील पेण,बोर्जे, वढाव, वडखळ, कामार्लीपेण तालुका सहकारी ख.वि.संघ लि. पेण, शिर्कीचाळ येथील अदिती ऑग्रो प्रोडयुसर कं.लि.

पनवेल तालुक्यातील मार्केटयार्ड पनवेल-1 येथील पनवेल सहकारी भात गिरणी लि.,

खालापू तालुक्यातील चौक येथील नेताजी सह.भात गिरणी लि., कर्जत तालुक्यातील नेरळ येथील नेरळ विविध कार्यकारी सेवा सोसायटी लि., कर्जत, वैजनाथ आणि कडाव येथील कर्जत तालुका शेतकरी सह.खरेदी विक्री संघ लि. मार्केटयार्ड दहिवली मु.पो.कर्जत, कशेळे येथील कशेळे  सहकारी भात गिरणी  लि.,

सुधागड तालुक्यातील परळी आणि पाली येथील सुधागड तालुका खरेदी विक्री संघ, बल्लाळेश्वर नाविन्यपूर्ण सर्व सेवा सहाकारी संस्था पाली,

रोहा तालुक्यातील यशवंतखार, रोहा, कोलाड आणि चणेरा येथील भैरवनाथ दूध उत्पादक सहकारी संस्था लि., श्रीवर्धन तालुक्यातील रानवली येथील रानिवली वि. का. सेवा सहकारी सोसायटी लि., माणगाव तालुक्यातील माणगाव ता.शेतकरी सह खरेदी विक्री संघ लि., महाड तालुक्यातील महाड तालुका शेतकरी सहकारी ख.वि.संघ लि., पोलादपूर तालुक्यातील पोलादपूर तालुका सहकारी ख.वि. संघ लि.मु.पो.पोलादपूर आणि देवळे येथील दत्तकृपा महिला औ.उ. सहकारी संस्था लि. व म्हसळा तालुक्यातील म्हसळा ता. सह.खरेदी विक्री संघ ‍लि.मु.पो.म्हसळा अशा एकूण 32 केंद्रांना पणन हंगाम 2023-2024 मधील धान खरेदीकरिता मंजूरी देण्यात आली आहे.

पेण तालुक्यातील मे.जय जलाराम राईस मिल,वरसई पेण, सुधागड तालुक्यातील पेडली, महागाव आणि नांदगाव येथील राजेश राईस मिल,कान्हिवली,पो.पेडली ता.सुधागड, झाप येथील अनिकेत राईस मिल, झाप,पो.पाली, माणगाव तालुक्यातील तळेगाव येथील धनंजय राईस मिल तळेगाव या गिरणी संलग्न सब एजंट संस्थामार्फत गिरणीधारकांच्या गोदामातील मंजूर करण्यात आलेली 6 खरेदी केंद्र आहेत.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक