कोविड तपासणी व उपचार केंद्र तसेच रुग्णालयांमध्ये दिव्यांग व्यक्तींना तपासणी, उपचार व लसीकरणासाठी प्राधान्य देण्याचे आवाहन
अलिबाग,जि.रायगड,दि.08 (जिमाका):- सद्य:स्थितीत कोविड-19 आजाराची परिस्थिती लक्षात घेता, कोविड तपासणी व उपचार केंद्र तसेच रुग्णालयांमध्ये दिव्यांग व्यक्तींना प्राधान्याने उपचार देण्यात यावेत, यासाठी अवर सचिव, दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग, भारत सरकार यांच्या पत्रान्वये दिव्यांग व्यक्तींना कोविड-19 करिता करण्यात येणारी तपासणी, उपचार व लसीकरणासाठी प्राधान्य देण्याबाबत सर्व केंद्रांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुषंगाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी राज्यातील कोविड तपासणी व उपचार केंद्र तसेच रुग्णालयांमध्ये दिव्यांग व्यक्तींना प्राधान्य देण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्याबाबत कळविण्यात आले. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील कलम 25 (1) (क) नुसार दिव्यांग व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेण्याकरीता त्यांच्या आजाराची दखल घेणे व त्यांना उपचारात प्राधान्य देणे आवश्यक आहे. सद्य:स्थितीत राज्यातील कोविड-19 आजाराची परिस्थितीत दिव्यांगांना या आजाराबाबत तपासणी, उपचार व लसीकरण करण्याकरिता रांगेत उभे राहावे लागत आहे. दिव...