घोषवाक्य लेखन स्पर्धेत सर्व ग्रामपंचायतीनी सहभाग घ्यावा --मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील

 

 

 

अलिबाग,जि.रायगड दि.7 (जिमाका) :- स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत हागणदारीमुक्त अधिक कार्यक्रम अधिक सक्रिय करण्यासाठी हागणदारीमुक्त अधिक या विषयावर "घोषवाक्य लेखन स्पर्धा" दि. 01 सप्टेंबर 2021 ते दि. 15 ऑक्टोबर 2021 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत.

ही घोषवाक्य लेखन स्पर्धा चा उद्देश हागणदारीमुक्त कार्यक्रमाबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करून लोकसहभाग वाढविणे हा आहे. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना राज्य व जिल्हा पातळीवर गौरविण्यात येणार आहे. सहभागी ग्रामपंचायतनी शौचालयाचा नियमित वापर, लहान मुलाच्या विष्टेचे व्यवस्थापन, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, गोबरधन, ओला, सुका व प्लॅस्टिक कचरा विलगीकरण इत्यादी विषयावर जास्तीत जास्त रंगीत घोषवाक्ये भिंतीवर लिहिण्याची आहेत.

सर्व घोषवाक्ये (संदेश) गावातील सार्वजनिक जागा/सभागृह, सरकारी दवाखाने, बाजारपेठ, पोस्ट, बस स्थानक, ग्रामपंचायत कार्यालये, शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी दर्शनी भागात रंगविण्यात यावीत. घोषवाक्ये (संदेश) भिंतीवर रंगविण्यासाठी किमान 6 फूट x 4 फूट असा निश्चित आकार असावा.

ग्रामपंचायतीने दि. 15 सप्टेंबर 2021 पर्यंत गट विकास अधिकारी यांच्याकडे सर्व छायाचित्रे एकत्रित करून सादर करणे अनिवार्य आहे. दि.2 ऑक्टोबर 2021 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी पहिल्या तीन ग्रामपंचायतींची निवड करतील व त्या ग्रामपंचायतींना जिल्हास्तरावर प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. दि.15ऑक्टोबर 2021 ला राज्यस्तरावरुन निवडलेल्या तीन जिल्ह्यांची नावे जाहीर करण्यात येणार आहेत. ग्रामपंचायतींनी करोनाचे नियम पाळून स्पर्धा घ्याव्यात.

रायगड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) डॉ. ज्ञानदा फणसे यांनी केले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत