जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त अभिवादन

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 12:- जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस उप जिल्हाधिकारी (सा.प्र.)श्रीधर बोधे यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. तसेच जिल्हा माहिती व सूचना अधिकारी चिंतामणी मिश्रा तसेच उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) विश्वनाथ वेटकोळी व जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते. 00000