अलिबाग, जि. रायगड, दि.26- रायगड जिल्ह्यात जादा पर्यटक येण्याची शक्यता लक्षात घेता, येत्या 29 ते 31 डिसेंबर (शुक्रवार ते रविवार) दरम्यान जिल्ह्यातील सर्व प्रमुख मार्गांवरील रहदारी सुरळीत ठेवून पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्या. या कालावधीत जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावरील अवजड वाहतूक बंद करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज येथे दिले. नुकत्याच दि. 23 ते 25 डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यात विविध पर्यटन स्थळांवर पर्यटकांचा ओघ वाढल्याची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी सर्व संबंधित विभागांची तात्काळ बैठक बोलावून पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अभय यावलकर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सरक, वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक मनोज म्हात्रे, मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी डी.एच. पाटील, सहाय्यक बंदर निरीक्षक पी.एम. राऊळ आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले की, येत्या 29 डिसेंबर पासून पुन्हा पर्यटकांचा ओघ वाढण्य...