केंद्रीय मंत्री ना.अनंत गिते यांचा जिल्हा दौरा



        अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.28-  केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री ना.अनंत गिते हे शनिवार व रविवार दि.30 व 31  रोजी रायगड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढील प्रमाणे.
            शनिवार दि.30 रोजी दुपारी साडे बारा वाजता महाराष्ट्र सिमलेस सुकेली, नागोठणे जि.रायगड येथे आगमन. दुपारी अडीच वाजता महाराष्ट्र सिमलेस सुकेली, नागोठणे जि.रायगड येथून रोहा जि.रायगडकडे प्रयाण. दुपारी तीन वाजता अप्पा देसाई यांचे निवासस्थान रोहा, जि.रायगड येथे आगमन. दुपारी साडे तीन वाजता रोहा येथून मुरुड जि.रायगड कडे प्रयाण. सायं. साडे पाच वाजता मुरुड येथे आगमन. रात्री आठ वाजता महाराष्ट्र सिमलेस सुकेली, नागोठणे जि.रायगड कडे प्रयाण. रात्री साडे नऊ वाजता महाराष्ट्र सिमलेस सुकेली, नागोठणे जि.रायगड येथे आगमन व मुक्काम.
            रविवार दि. 31 रोजी सकाळी दहा वाजता महाराष्ट्र सिमलेस सुकेली, नागोठणे जि.रायगड येथून मुंबईकडे प्रयाण.
०००००


Comments