Posts

Showing posts from August 9, 2026

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त रायगडमध्ये विविध उपक्रम; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी 5 विद्यार्थी पात्र

Image
  रायगड(जिमाका) दि.15:- आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग यांच्या वतीने रायगड जिल्ह्यात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील यांच्या नियोजनानुसार हे उपक्रम राबविण्यात येत आहेत. अलिबाग समुद्रकिनारी 13 ऑगस्ट रोजी झालेल्या 5 किलोमीटर रेड रन स्पर्धेत 17 ते 25 वयोगटातील 41 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मुलांमध्ये स्वागत समीर पाटील प्रथम, अक्षय राजा लेंडी द्वितीय तर मुलींमध्ये करिष्मा प्रकाश म्हात्रे प्रथम आणि मुग्धा नरेश पाटील द्वितीय ठरल्या. तृतीय क्रमांक अनुक्रमे यश दत्ताराम म्हात्रे व करिष्मा यशवंत हिरवे यांनी मिळविला. 14 ऑगस्ट रोजी झालेल्या एचआयव्ही/एड्स विषयावरील प्रश्नमंजुषा स्पर्धेत स्नेहा मुंडे प्रथम, वैष्णवी प्रमोद मोकल द्वितीय आणि रुचिता धारसे तृतीय ठरल्या. रेड रनमधील मुलांचे व मुलींचे प्रथम-द्वितीय क्रमांकाचे विजेते तसेच प्रश्नमंजुषेतील प्रथम क्रमांकाची स्नेहा मुंडे हे २३ ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे होणाऱ...

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न

Image
    रायगड(जिमाका) दि.15:- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिनाच्या 80 व्या वर्धापनदिनी ध्वजारोहण जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) डॉ.रविंद्र शेळके, जिल्हा नियोजन अधिकारी उमेश सुर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, नितीन वाघमारे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) भारत वाघमारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते ०००००

रायगडचा सर्वांगीण विकास ही आपली सामूहिक जबाबदारी -मंत्री भरत गोगावले स्वातंत्र्यदिनानिमित्त अलिबाग येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण उत्साहात संपन्न

Image
  रायगड-अलिबाग,दि.15 (जिमाका): नागरिकांच्या आशा-आकांक्षांचा विचार करून विकासप्रक्रियेत त्यांचा सक्रिय सहभाग, योग्य नियोजन, उत्पन्नाच्या स्रोतांची वाढ आणि विविध विकास प्रकल्पांचा गतीने पाठपुरावा करून भविष्यातील 'विकसित रायगड जिल्हा' साकारणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी केले.                   भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वाटचालीत 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अलिबाग येथील पोलीस परेड मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात मंत्री गोगावले यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.               या सोहळ्यास आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के आणि उपजिल्हाधिकारी डॉ. रविंद्र शेळके यांच्यासह विविध विभागांचे अधिक...