Posts

Showing posts from November 8, 2026

LED मासेमारीविरोधात मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई। काशिद समोरील जलधिक्षेत्रात LED दिवे व जनरेटरसह नौका जप्त

    रायगड-अलिबाग,दि.13(जिमाका): रायगड जिल्ह्याच्या सागरी क्षेत्रात अनधिकृत व अवैध मासेमारीला आळा घालण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने (दि.09 नोव्हेंबर व दि.12 नोव्हेंबर 2026) रोजी काशिद समोरील जलधिक्षेत्रात गस्तीदरम्यान LED दिवे व जनरेटरच्या साहाय्याने मासेमारी करणाऱ्या नौकेवर धडक कारवाई करून नौकेसह LED साहित्य व जनरेटर जप्त करण्यात आले.   रायगड जिल्ह्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती नौकेद्वारे समुद्रात गस्त सुरू असताना, विभागाच्या मा.आयुक्त मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबई, मा.अतिरिक्त आयुक्त मत्स्यव्यवसाय (योजना), मा. सहआयुक्त मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबई तसेच सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय रायगड-अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली  सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, (परवाना अधिकारी) मुरुड-जंजिरा स्वप्निल अ. दाभणे यांनी ही कारवाई केली. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन LED दिवे व जनरेटरच्या साहाय्याने अनधिकृत मासेमारी करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या नामदेव महादेव कावळे, रा. दिघी, रायगड यांच्या मालकीच्या "साईरत्न" (नौका नोंदणी क्रमांक IND-MH-३-MM-445...

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा जिल्ह्यातील मच्छिमार बांधवांनी लाभ घ्यावा

    रायगड-अलिबाग,दि.13(जिमाका): राज्यात मत्स्यव्यवसाय क्षेत्रामध्ये शाश्वत विकासाद्वारे निलक्रांती घडविण्यासाठी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाकडून 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना" अंतर्गत 6 राज्यस्तरीय व 19  जिल्हास्तरीय योजनांना तसेच सद्य:स्थितीत अस्तित्वात असलेल्या 3 जिल्हास्तरीय योजनांमध्ये सुधारणा करण्यात आलेल्या असून कृषी व पदुम विभागाच्या दि.09 मार्च 2026 च्या शासन निर्णयान्वये 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना अंमलात आलेली आहे.  रायगड जिल्ह्यातील होतकरू लाभार्थी आणि मच्छिमार बांधवांनी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा लाभ घेवून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय रायगड-अलिबाग जे.एस. पटेल यांनी केले आहे. महाराष्ट्राने 2047 पर्यंत "विकसित महाराष्ट्र-विकसित भारतासाठी" हे ध्येय निश्चित केले असून या योजनांच्या आधारे विकसित महाराष्ट्र 2047 चे उद्दिष्ट साध्य होण्यास प्रोत्साहन मिळेल व मच्छिमारांचे आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यास सहाय्य होईल. "मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना" ही सर्वसमावे...