जिल्हास्तरीय दिशा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न अध्यक्ष खासदार श्रीरंग बारणे व सहअध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांची प्रमुख उपस्थिती
रायगड, (जिमाका)दि.31:- जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती(दिशा)ची खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली व समितीचे सहअध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक आज जिल्हा नियोजन सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे झाली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्ग व रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या व वाहतूक नियमानासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) च्या बैठकीनंतर संसदीय रस्ता सुरक्षा समिती व जिल्हास्तरीय विद्युत वितरण सनियंत्रण समिती यांच्या बैठका संपन्न झाल्या. या बैठकांसाठी आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे, प्रकल्प संचालक श्रीमती प्रियदर्शिनी मोरे, समिती सदस्य श्रीमती दिपाली पाटील यांसह विविध समित...