सुसज्ज व उत्तम कार्यालयामुळे नागरिकांना सुलभ शासकीय सेवा मिळू शकेल --सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

 


 

रायगड जिमाका दि.28:- सार्वजनिक बांधकाम विभागाच्या  सार्वजनिक बांधकाम विभागीय कार्यालय पनवेल आणि उपविभागीय कार्यालय पनवेल क्रमांक एक व पनवेल क्रमांक दोनभिंगारी प्रस्तावित कार्यालयीन इमारतीचे भूमिपूजन आज सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते भिंगारी ता.पनवेल येथे झाले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपस्थित अधिकाऱ्यांशी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

या कार्यक्रमास आमदार प्रशांत ठाकूरमुख्य अभियंता सा.बा.प्रादेशिक विभाग कोकण, श्री.शरद राजभोज, अधिक्षक अभियंता रायगड श्रीमती सुषमा गायकवाडअधीक्षक अभियंता श्रीमती रुपाली पाटील, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग  अलिबाग श्री.जगदीश सुखदेवे तसेच सबंधित विभागाचे अधिकारीकर्मचारी उपस्थित होते.

 सार्वजनिक बांधकाम विभागाची विभागीय कार्यालय ही चांगली व सुसज्ज असली पाहिजे. यामुळे कार्यालयीन अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांचा कार्यक्षमतेमध्ये नक्कीच वाढ होईल. तसेच येथील राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना या सुसज्ज व चांगल्या कार्यालयाचा नक्कीच फायदा होईल व नागरिकांना सुलभ शासकीय सेवा मिळू शकेल, असे श्री.चव्हाण यावेळी म्हणाले.  सार्वजनिक विभागाची सर्वच विभागीय कार्यालय अशाच पद्धतीने सुसज्ज व उत्तम आणि दर्जेदार करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

000000


Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज