“राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता..सेवा पंधरवडा”, जिल्हा प्रशासनाचा शून्य प्रलंबिततेचा संकल्प

नागरिकांच्या प्रलंबित अर्जांचा स्थानिक पातळीवर जलदगतीने निपटारा करण्यासाठी विशेष मोहीमेची आढावा बैठक संपन्न अलिबाग,दि.22 (जिमाका):- जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात दि.17 सप्टेंबर ते दि.02 ऑक्टोबर 2022 या कालावधीत “ राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा ” निमित्ताने आपले सरकार, नागरी सेवा केंद्र व इतर वेबपोर्टलवरील नागरिकांच्या प्रलंबित अर्जांचा स्थानिक पातळीवर जलदगतीने निपटारा करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या निमित्ताने जिल्हा प्रशासनाने शून्य प्रलंबिततेचा संकल्प केला आहे. त्यानुषंगाने या मोहिमेच्या कार्यवाहीबाबतच्या सद्य:स्थितीचा आढावा दूरदृष्यप्रणालीद्वारे अपर जिल्हाधिकारी अमोल यादव यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातून घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील, तहसिलदार विशाल दौंडकर, सचिन शेजाळ, जिल्हा प्रशासन अधिकारी शाम पोशट्टी, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे, सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी आदी उपस्थित होते. या विशे...