शासकीय मागासवर्गीय वसतिगृहातील स्वयंपाकी, मदतनीस व इतर कर्मचाऱ्यांकरीता स्वयंपाकाच्या गॅस वापर व सुरक्षिततेबाबत प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न


 

अलिबाग,दि.22 (जिमाका):-  “सेवा पंधरवडा कार्यक्रमांतर्गत आज दि.22 सप्टेंबर 2022 रोजी मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, अलिबाग येथे वसतिगृहातील स्वयंपाकघरात गॅस वापरताना कुठल्याही प्रकारची दूर्घटना घडू नये, याकरिता हिंदुस्थान पेट्रोलियम यांच्या सहकार्याने वसतिगृहातील गृहपाल, स्वयंपाकी, मदतनीस व इतर कर्मचारी यांच्याकरिता एलपीजी सिलेंडर, शेगडी इत्यादीचा शास्त्रशुध्द वापर कसा करावा? याचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.

या कार्यशाळेत श्री.निशाद पाटील व कु.सायली मोरे यांनी स्वयंपाकघरात गॅस सिलेंडर वापरताना कोणती काळजी घ्यावी? कोणकोणत्या चुका टाळाव्यात याविषयीची माहिती दिली. त्यामुळे आपण आपल्या वसतिगृहात तसेच प्रत्येकाच्या घरातही सुरक्षित राहू शकतो. दोनही वसतिगृहातील स्वयंपाकी व मदतनीस यांना उपयुक्त अशी माहिती दिली.

या प्रशिक्षणासाठी समाज कल्याण, सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यालय अधीक्षक श्रीमती माधुरी पाटील यांनी केले. तर श्रीमती उषा गुजेला यांनी उपस्थित अधिकारी/कर्मचारी यांचे आभार मानले.

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज