बळीराजाच्या स्वयंपूर्णतेकडे वाटचालीसाठी उत्तम मार्ग… शेतकरी उत्पादक संस्था (FPOs)
सन 2019-2024 या कालावधीसाठी व त्या पुढेही सन 2027-28 या कालावधी पर्यंत संपूर्ण देशात 10 हजार नवीन “ शेतकरी उत्पादक संस्थां ” ची (FPOs) निर्मिती करून “ शेतकरी उत्पादक संस्थां ” ची (FPOs) स्थापना व प्रचार (FPOs) ही नवीन योजना एक एफपीओ/मंडळ याप्रमाणे राबविण्याचा केंद्र शासनाचा संकल्प आहे. त्या अनुषंगाने राज्यस्तरावर राज्यस्तरीय सल्लागार समिती व जिल्हास्तरावर जिल्हास्तरीय नियंत्रण समिती स्थापन करण्याबाबतचे निर्देश केंद्र शासनाने दिले आहेत. त्याप्रमाणे राज्यस्तरावर राज्यस्तरीय सल्लागार समिती व जिल्हास्तरावर जिल्हास्तरीय नियंत्रण समिती समिती स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेचे संचालन व केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे अनुपालन आयुक्त (कृषी) यांच्या स्तरावरून करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय सल्लागार समिती या समितीमध्ये अध्यक्ष-सचिव (कृषी), सहअध्यक्ष- प्रधान सचिव (पणन), सदस्य- अपर मुख्य सचिव (ग्रामविकास विभाग), प्रध...