Posts

Showing posts from May 31, 2026

शिवराज्याभिषेक सोहळा-2026 करिता जड-अवजड वाहनांकरिता वाहतुक बंदी आदेश जारी

      रायगड-अलिबाग,दि.02(जिमाका):- श्री शिवराज्याभिषेक सोहळा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून दि.05 जून रोजी सायं.4.00 ते दि.06 जून 2026 रोजी रात्रौ 10.00 वाजेपर्यतच्या कालावधीमध्ये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाकणफाटा नागोठणे ते कशेडी पर्यत तसेच  माणगांव-निजामपुर मार्गे पाचाड ते रायगड किल्ला, माणगांव ढालघरफाटा मार्गे पाचाड ते रायगड किल्ला, महाड नातेखिंड मार्गे पाचाड ते रायगड किल्ला या मार्गावरील होणारी सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांकरिता जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी वाहतुक बंदी अधिसूचना जारी केली आहे. श्री शिवराज्याभिषेक सोहळा-2026 हा कार्यक्रम दि.05 जून  व दि.06 जून 2026 रोजी किल्ले रायगड येथे साजरा होणार आहॆ.  या कार्यक्रमासाठी  रायगड, पुणे, सातारा, कोल्हापुर, मुंबई वैगेरे ठिकाणाहून लाखोंच्या संख्येने श्री शिवभक्त हे आपआपली वाहने घेवून येत असतात. तसेच या कार्यक्रमाकरीता आयोजकांच्या सामानाची वाहने देखील मोठ्या प्रमाणात श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याकरीता येत असतात.  या सोहळ्याकरीता येणारे शिवभक्त हे रायगड किल्ला येथे माणगांव-निजामपुर म...

1962 हेल्पलाइन व व्हॉट्सॲप चॅटबॉट द्वारे राज्यातील पशुवैद्यकीय सेवांचे सक्षमीकरण

    रायगड-अलिबाग,दि.2(जिमाका):- गेल्या पाच वर्षांत , भारत फायनान्शियल इंक्लुजन लिमिटेड , इंडसइंड बँक व पशुसंवर्धन विभाग , महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या 1962 या टोल-फ्री हेल्पलाइनने राज्यातील पशुवैद्यकीय सेवांचे जाळे बळकट केले आहे. ' मोबाईल व्हेटर्नरी युनिट्स ' म्हणजेच फिरत्या पशुवैद्यकीय वाहनांच्या माध्यमातून या उपक्रमाने विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या दारात पशुवैद्यकीय आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत 8 लाखांहून अधिक जनावरांवर उपचार करण्यात आले असून , यामुळे पशुधनाची वेळेवर , सुलभ व विश्वासार्ह काळजी घेणे शक्य झाले आहे. या उपक्रमाच्या यशानंतर , भारत फायनान्शियल इंक्लुजन लिमिटेड (इंडसइंड बँक) व पशुसंवर्धन विभाग , महाराष्ट्र शासन यांनी सेवा अधिक गतिमान करण्यासाठी ' व्हॉट्सॲप-आधारित चॅटबॉट सेवा ' सुरू केली आहे. या डिजिटल उपक्रमाचा उद्देश संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना सेवा मिळवणे सोपे करणे , संवाद सुलभ करणे व रिअल-टाइम (तात्काळ) पशुवैद्यकीय साहाय्य प्रदान करणे हा आहे. व्हॉट्सॲप चॅटबॉट ...

अमृत संस्थेमार्फत पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांसाठी उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रमाचे आयोजन

    रायगड-अलिबाग, दि.2(जिमाका):- अमृत या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या "अमृत पर्यटन" उपक्रमांतर्गत पर्यटन क्षेत्राशी संबंधित उद्योजक, व्यावसायिक व नवउद्योजकांसाठी उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रम ( Entrepreneurship Development Programme - EDP ) आयोजित करण्यात आला आहे. अमृत पर्यटन हा महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी, स्थानिक रोजगार निर्मिती वाढविण्यासाठी तसेच पर्यटनाशी संबंधित उद्योजकांना सक्षम करण्यासाठी राबविण्यात येणारा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. या उपक्रमाद्वारे राज्यातील पर्यटन स्थळे, पर्यटन सेवा, स्थानिक उत्पादने व पर्यटन व्यवसायांना नवीन संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. पर्यटन क्षेत्र हे देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या क्षेत्रांपैकी एक असून, या क्षेत्रात व्यवसाय विस्तार, रोजगार निर्मिती व आर्थिक प्रगतीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. या संधींचा लाभ अधिकाधिक उद्योजकांना मिळावा आणि त्यांना आधुनिक व्यवसाय व्यवस्थापन कौशल्ये प्राप्त व्हावीत, या उद्देशाने या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे...