धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या नाव आणि नियमावलीतील सुधारणा

 

रायगड-अलिबाग,दि.04 (जिमाका) :-शासनाच्या गृह विभागाकडील दि.20 मे 2026 चे शासन शुद्धीपत्रक आणि परिवहन आयुक्त कार्यालयाच्या निर्देशानुसार, राज्यातील ऑटो-रिक्षा व मीटर्ड टॅक्सी चालक/मालकांच्या सामाजिक व आर्थिक कल्याणासाठी स्थापित करण्यात आलेल्या कल्याणकारी मंडळाच्या नावात आणि नियमावलीत शासनाने अत्यंत महत्त्वपूर्ण सुधारणा केली आहे अशी  माहिती   प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल जयंत चव्हाण यांनी दिली आहे.

या कल्याणकारी मंडळाचे नाव बदलून आता "धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळ" असे करण्यात आले आहे. यापूर्वी या मंडळाचे सभासदत्व केवळ ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालकांपुरतेच मर्यादित होते. मात्र, जास्तीत जास्त वाहन चालकांना विविध सरकारी कल्याणकारी योजना व सुविधांचा लाभ मिळावा या उ‌द्देशाने शासनाने आता याच्या पात्रतेमध्ये मोठी सुधारणा केली आहे. नवीन नियमांनुसार, ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांसोबतच, सर्व प्रकारची प्रवासी वाहने चालविणारे आणि वैध 'बॅज' (Badge) व अनुज्ञप्ती (Driving License) धारक असलेले सर्व चालक या मंडळाचे सभासद होण्यासाठी पात्र ठरले आहेत.

सर्व प्रकारच्या प्रवासी वाहनांच्या अधिकृत बॅजधारक चालकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. मंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी पात्र चालकांनी जास्तीत जास्त संख्येने या कल्याणकारी मंडळाचे सभासद व्हावे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन