Posts

Showing posts from October 11, 2026

नागरिकांना अखंडित आणि योग्य दाबाने वीजपुरवठा करा-पालकमंत्री भरत गोगावले रोहित्रांची क्षमता वाढवा; नवीन विद्युत उपकेंद्रे उभारण्यासह सौरऊर्जा योजनांना गती द्या

Image
    रायगड-अलिबाग, दि.12(जिमाका): जिल्ह्यातील नागरिकांना अखंडितपणे, योग्य दाबाने आणि विनाअडथळा वीजपुरवठा होण्यासाठी विद्युत वितरणाची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. वाढती विजेची मागणी लक्षात घेऊन रोहित्रांची क्षमता वाढवावी, आवश्यकतेनुसार नवीन विद्युत उपकेंद्रे प्रस्तावित करावीत आणि दुर्गम तसेच डोंगराळ भागातील नागरिकांनाही नियमित वीजपुरवठा होईल, याची दक्षता घ्यावी. विद्युत वितरणाबाबत नागरिकांच्या तक्रारी उद्भवणार नाहीत, यासाठी यंत्रणेने तत्परतेने काम करावे, असे निर्देश फलोत्पादन मंत्री तथा पालकमंत्री भरत गोगावले यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात विद्युत वितरण कंपनीच्या कामकाजाचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकर पाटील, शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक ऑचल दलाल, अपर जिल्हाधिकारी सचिन ढोले, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक उपस्थित होते. रोहित्रांची क्षमता वाढवा; नवीन उपकेंद्रांचे नियोजन करा वाढत्या वीजवापरामुळे विजेची मागणी...

दुष्काळी परिस्थितीच्या संकटावर एकजुटीने मात करूया; दुष्काळ निवारणाच्या कामे प्राधान्याने करा –पालकमंत्री भरत गोगावले उपलब्ध पाण्याचे काटेकोरपणे नियोजन करत पिण्याच्या पाण्याचा सर्वोच्च प्राधान्य द्या

Image
    रायगड-अलिबाग, दि.12 (जिमाका) :- जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून दुष्काळ निवारणाची कामे प्राधान्याने आणि सर्वांच्या समन्वयातून पूर्ण करा. उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करताना पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य द्या. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारणाची कामे तातडीने हाती घ्या आणि नागरिकांसह जनावरांनाही पाणी उपलब्ध होईल, याची दक्षता घ्या. दुष्काळी परिस्थिच्या या संकटावर मात करण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकजुटीने आणि जबाबदारीने काम करावे, असे निर्देश राज्याचे फलोत्पादन मंत्री तथा पालकमंत्री भरत गोगावले यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे दुष्काळसदृश परिस्थिती, पीक पाहणी आणि संभाव्य पाणीटंचाईवरील उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अधिकारी मंगेश वाकडीकर, शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले, अपर जिल्हाधिकारी सचिन ढोले, पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती वंदना शिंदे आदी उपस्थित होते. ...