Posts

Showing posts from January 11, 2026

पनवेल व उरण पंचायत समिती कार्यक्षेत्रामध्ये भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे मनाई आदेश जारी

  रायगड-अलिबाग,दि.16(जिमाका )  मा.राज्य निवडणूक आयोगाने दि.13 जानेवारी 2026 रोजीचे अधिसुचनेनुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक सन-2026 करीता निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामधील रायगड जिल्हा परिषद अंतर्गत पनवेल व उरण पंचायत समिती कार्यक्षेत्रामध्ये दि. 16 जानेवारी 2026 रोजी पासून दि.21 जानेवारी 2026 रोजी पर्यत निवडणुक कार्यक्रमांनुसार उमेदवार किंवा त्यांच्या कोणत्याही सुचकाकडून नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यात येणार आहे. तसेच उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दि.27 जानेवारी 2026 आहे. त्याअनुषंगाने, विविध राजकीय पक्ष नामनिर्देशन पत्र सादर करतेवळी उमेदवारांच्या समर्थनार्थ शक्ती प्रदर्शन करणे, विविध वाहनांचा वापर करणे, घोषणाबाजी करणे यामुळे किरकोळ कारणावरून वाद निर्माण होवून पक्ष कार्यकर्त्यामध्ये असंतोषाचे वातावरण तयार होते तसेच रहदारीच्या नियमनात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून सार्वजनिक शांततेचा भंग होण्याची शक्यता आहे. त्याकरिता पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई रश्मि नांदेडकर यांनी भारतीय नागरीक सुरक्षा सं...

रायगडचा राज्य क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा

रायगड-अलिबाग,दि.16(जिमाका ) :- स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलंपिक पदक विजेते म्हणून ज्यांचा संपूर्ण भारताला अभिमान आहे असे महाराष्ट्राचे सुपुत्र दिवंगत खाशाबा जाधव यांनी ऑलंपिक मध्ये केलेल्या कामगिरीचा गौरव व नवोदित खेळाडूंना दर्जेदार कामगिरी करण्यासाठी प्रेरणा व प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांचा जन्मदिन दि.15 जानेवारी, हा राज्य क्रीडा दिन म्हणून मुख्य समारंभ नवी मुंबई पोलीस मुख्यालय कळंबोली पनवेल येथील मैदानात तर रायगड मध्ये विविध ठिकाणी साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे तीनवेळचे महाराष्ट्र केसरी  विजय चौधरी, उपायुक्त नवी मुंबई पोलीस मुख्यालय, शिवछत्रपती संजय कड्डू टेबल टेनिस, सुर्यकांत ठाकूर, कबड्डी, ऋषिकेश मालोरे वुशू, श्रेयस वैद्य वॉटरपोलो यांच्यासह राजाराम कुंभार खेलो इंडीयाचे मुख्य प्रशिक्षक, समीर रेवाळे, क्रीडा समन्वयक पनवेल महानगरपालिका, सोनार सर रायगड हॉकी संघटना व्यासपीठावर उपस्थित होते विविध खेळातील 80 खेळाडूंचा ज्यांनी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पदक प्राप्त केले आहेत अशk खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. आजच्या सत्कार कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये म्हणजे खेळाडूंचा सत्कार हा ...

15 जानेवारी रोजी राज्य क्रीडा दिनाचे आयोजन आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय विशेष प्राविण्य प्राप्त खेळाडूंचा होणार गौरव सोहळा

  .   रायगड-अलिबाग,दि.14(जिमाका ) :-  ऑलिम्पिक वीर दिवंगत खाशाबा जाधव यांचा जन्मदिनानिमित्त रायगड जिल्ह्याचा राज्य क्रीडा दिन दि.15 जानेवारी 2026 रोजी पोलीस मुख्यालय, कळंबोली नवी मुंबई येथे सायंकाळी 5.00 वाजता साजरा करण्यात येणार असून या राज्य क्रीडा दिनी रायगड जिल्ह्यातील सन 2025-26 मध्ये सर्व राष्ट्रीय, राज्य क्रीडा पुरस्कारार्थी, आंतरराष्ट्रीय पदक विजेते खेळाडू तसेच राष्ट्रीय शालेय पदक विजेते खेळाडू यांना विविध मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व दिवंगत खाशाबा जाधव यांच्या क्रीडा कामगिरी व कार्याचा परिचय होण्यासाठी त्यांच्या जीवनावर आधारीत पुस्तकाचे वितरण केले जाणार असून या राज्यस्तरीय कार्यक्रमास खेळाडू आणि क्रीडा प्रेमींनी मोठ्या प्रमाणात सहभागी, व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ यांनी केले आहे. स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक  ऑलिम्पिक   पदक विजेते म्हणून ज्यांचा संपूर्ण भारताला अभिमान आहे असे महाराष्ट्राचे सुपुत्र दिवंगत खाशाबा जाधव यांनी  ऑलिम्पिक मध्ये केलेल्या कामगिरीचा गौरव व नवोदित खेळाडूंना दर्जेदार कामगिरी करण्यासाठी प्रेरणा व प्...

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका-2026 जाहीर दि.5 फेब्रुवारीला मतदान तर दि.7 फेब्रुवारी रोजी होणार मतमोजणी

Image
    रायगड-अलिबाग,दि.14(जिमाका ) :-  मा.राज्य निवडणूक आयोगाने दि.13 जानेवारी 2026 रोजी   जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका-2026 जाहीर केला आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका 2026 करिता सविस्तर निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला  असून रायगड जिल्ह्यात 59 गट, 118 गण असून 2 हजार 323 मतदान केंद्रांवर गुरुवार, दि.5 फेब्रुवारीला मतदान तर शनिवार, दि.7 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.  या निवडणुकांसाठी 15 निवडणूक निर्णय अधिकारी व 15 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात एकूण 59 जिल्हा परिषद गट व 118 पंचायत समिती गणांची तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे आहे. पनवेल गट संख्या  8 गट व गण संख्या 16, कर्जत गट संख्या  6 गट व गण संख्या 12,  खालापूर गट संख्या  4 गट व गण संख्या 8,  सुधागड गट संख्या  2 गट व गण संख्या ...

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त अलिबागमध्ये अमली पदार्थमुक्त भारतासाठी भव्य रॅली व पथनाट्य कार्यक्रम संपन्न

Image
    रायगड-अलिबाग,दि.13(जिमाका ): स् वामी विवेकानंद जयंती व 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिनानिमित्त अमली पदार्थमुक्त भारत या उद्देशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग यांच्या विद्यमाने अलिबागमध्ये भव्य जनजागृती रॅली कार्यक्रम (दि.12 जानेवारी ) रोजी रायगड जिल्ह्याचे  प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश  राजेंद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय युवा दिनानिमित्त अलिबागमध्ये अमली पदार्थमुक्त भारतासाठी भव्य रॅली व पथनाट्य कार्यक्रम   संपन्न झाला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, अलिबाग येथून या रॅलीची सुरुवात झाली, तर रॅलीचा समारोप अलिबाग समुद्रकिनारा येथे करण्यात आला. या रॅलीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सेंट मेरी शाळा, अरुणकुमार वैद्य जूनियर कॉलेज, दत्ता पाटील विधी महाविद्यालय, जे.एस.एम.कॉलेज, लोकशिक्षण प्रसारक मंडळ महाविद्यालय चोंढी, शासकीय नर्सिंग कॉलेज, जिल्हा तंबाखू नियंत्रण विभाग, मानसिक आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालय रायगड–अलिबाग लायन्स क्लब श्रीबाग, आदी संस्थांचा सक्रिय सहभाग होता. तसेच शिक्षकेतर कर्मचारी, पॅनल वकील, विधी स्वयंसेवक, लोक अभिरक्षक का...

पाचाड येथे राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा 427 वा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

    रायगड-अलिबाग,दि.12(जिमाका ) : रायगड जिल्हा परिषद आणि पाचाड ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक किल्ले रायगड च्या पायथ्याशी असलेल्या राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या 427 व्या जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन पाचाड येथील समाधीस्थळी करण्यात आले होते. यावेळी रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकासमंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन,अभिषेक व महाआरती करण्यात आली. या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, उपविभागीय अधिकारी महाड पोपट ओमासे, तहसीलदार महेश शितोळे, गटविकास अधिकारी डॉ.स्मिता पाटील, माजी जि.प सदस्या मानसी दळवी, पाचाड सरपंच सीमा बेंदुगडे यांसह विविध अधिकारी, ग्रामस्थ, विद्यार्थी तसेच  विविध शिवभक्त संघटनेचे सदस्य उपस्थित होते. ०००
Image
  क्षयरुग्णांना पोषक आहार वाटप निक्षय मित्र महानगर गॅस कंपनीचा सामाजिक पुढाकार रायगड-अलिबाग,दि.12(जिमाका ) :   क्षयरोगमुक्त  जिल्ह्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महानगर गॅस लिमिटेडने मुंबई यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीतून (CSR) 550 क्षयरुग्णांना 3 हजार 300 पोषक आहार फूड बास्केटचे  वितरण  मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या हस्ते जिल्हा परिषद, अलिबाग येथे करण्यात आले. जिल्हाधिकारी किशन जावळे व मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्याना निक्षय मित्र बनवून त्यांना फूड बास्केट वाटप देण्यासाठीचे अहवान केले होते त्यास प्रतिसाद देत महानगर गॅस लिमिटेड मुंबईने ही कार्यवाही केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी सांगितले की, क्षयरोगमुक्त रायगड जिल्हा घडवण्यासाठी केवळ शासनाचेच नव्हे तर कॉर्पोरेट क्षेत्राचेही योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. अधिकाधिक कंपन्यांनी ‘निक्षय मित्र’ बनून क्षयरुग्णांच्या उपचार व पोषणासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. पोषणयुक्त आहारामुळे क्षयरोगाच्या रुग्णांना उपचारादरम्यान आवश्यक ऊर्जा...