क्षयरुग्णांना पोषक आहार वाटप

निक्षय मित्र महानगर गॅस कंपनीचा सामाजिक पुढाकार

रायगड-अलिबाग,दि.12(जिमाका) : क्षयरोगमुक्त  जिल्ह्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महानगर गॅस लिमिटेडने मुंबई यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीतून (CSR) 550 क्षयरुग्णांना 3 हजार 300 पोषक आहार फूड बास्केटचे  वितरण  मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या हस्ते जिल्हा परिषद, अलिबाग येथे करण्यात आले.

जिल्हाधिकारी किशन जावळे व मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्याना निक्षय मित्र बनवून त्यांना फूड बास्केट वाटप देण्यासाठीचे अहवान केले होते त्यास प्रतिसाद देत महानगर गॅस लिमिटेड मुंबईने ही कार्यवाही केली.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी सांगितले की, क्षयरोगमुक्त रायगड जिल्हा घडवण्यासाठी केवळ शासनाचेच नव्हे तर कॉर्पोरेट क्षेत्राचेही योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. अधिकाधिक कंपन्यांनी ‘निक्षय मित्र’ बनून क्षयरुग्णांच्या उपचार व पोषणासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.

पोषणयुक्त आहारामुळे क्षयरोगाच्या रुग्णांना उपचारादरम्यान आवश्यक ऊर्जा व प्रतिकारशक्ती मिळते, ज्यामुळे रोगमुक्तीची प्रक्रिया अधिक प्रभावी ठरते. महानगर गॅस लिमिटेडने या उपक्रमातून सामाजिक जबाबदारीची जाणीव दाखवत रुग्णांच्या आरोग्य संवर्धनासाठी मोलाचे योगदान दिले आहे.

या कार्यक्रमास जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.प्राची नेहूलकर, महानगर गॅस लिमिटेडचे सहाय्यक उपाध्यक्ष (मानव संसाधन) संकेत धोत्रे, मुख्य व्यवस्थापक (CSR) सुसंता कुमार राउत, सहाय्यक व्यवस्थापक (CSR) कु. प्रियांका दळवी यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

000000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान