नारी शक्ती पुरस्कार नामनिर्देशन सादर करण्याची अंतिम तारीख 15 जानेवारी 2020
अलिबाग दि.9, विशेषत: अपवादात्मक परिस्थितीमध्ये महिलांच्या आर्थिक व सामाजिक सबलीकरणाच्या क्षेत्रांमध्ये किंवा या विषयाशी संबंधीत किंवा आनुषंगीक उत्कृष्ट कार्य करणारे व्यक्ती किंवा संस्था, गट, संघटना हे नारी शक्ती पुरस्कारासाठी पात्र आहेत. 01/11/2019 रोजी ज्या व्यक्तीचे वय किमान 25 वर्षे आहे आणि ज्यांना यापूर्वी नारी शक्ती पुरस्कार, स्त्री शक्ती पुरस्कार मिळालेला नाही, तसेच ज्या संस्था, गट, संघटना यांनी किमान 5 वर्षे संबंधित क्षेत्रात काम केलेले आहे आणि ज्यांना यापूर्वी नारी शक्ती, स्त्री शक्ती पुरस्कार मिळालेला नाही असे व्यक्ती किंवा संस्था, गट, संघटना उपक्रम हे नारी शक्ती पुरस्कारासाठी पात्र आहेत. पारंपारीक व अपारंपारीक क्षेत्रामध्ये कौशल्य विकासासाठी महिलांना प्रोत्साहित करणे, ग्रामीण महिलांसाठी मुलभूत सुविधा सुकर करणे, विज्ञान व तंत्रज्ञान, क्रिडा, कला, संस्कृती इ. अपारंपारिक क्षेत्रामध्ये ठसेपणे व सार्थपणे बचाव व सुरक्षा, आरोग्य व निरोगीपणा, शिक्षण, कौशल्य विकास, जीवन कौशल्य, महिलांचा आदर व प्रतिष्ठा इ. बाबत कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था, गट, संघटना, उपक्रम यांन...