"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ संपन्न मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत एकही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही ---जिल्हाधिकारी किशन जावळे
.jpeg)
रायगड (जिमाका) दि.17:- मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना हा राज्य शासनाचा क्रांतिकारी निर्णय आहे. महिलांचे आरोग्य, पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. जिल्ह्यात या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही, यासाठी यंत्रणांनी दक्ष राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आज येथे दिले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण"योजनेचा"जिल्हास्तरीय शुभारंभ होरायझन सभागृह अलिबाग येथे संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार महेंद्र दळवी, माजी आमदार अनिकेत तटकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, अतिरिकत् मुख्य कार्यकारी सत्यजित बडे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) रविंद्र शेळके, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसिलदार विक्रम पाटील, जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी विनित म्हात्रे, जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी जि.प.निर्मला कुचिक आदि उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री.जावळे म्हणाले की,"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेच्या अंमलबजासाठी शासनाकडून निर्देश प्राप्त...