राष्ट्रीय/राज्य आपत्ती प्रतिसाद दल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व रायगड रोप-वे प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड रोप-वे येथे आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम संपन्न
अलिबाग,दि.28(जिमाका):- रायगड रोप-वे, पाचाड, ता.महाड येथे संभाव्य दुर्घटना झाल्यास त्या ठिकाणी बचाव कार्य कशा पध्दतीने करावे, यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.योगशे म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली व निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पद्दश्री बैनाडे यांच्या पुढाकारातून तसेच महाड उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड, महाड तहसिलदार सुरेश काशिद यांच्या नियोजनातून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ), जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड व रायगड रोप-वे प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम आज (दि.28 एप्रिल 2023) रोजी सकाळी 7 ते 10 या कालावधीमध्ये संपन्न झाली. या आपत्ती व्यवस्थापन रंगीत तालीममध्ये एनडीआरएफ चे डेप्युटी कमांडट दिपक तिवारी, असिस्टंट कमांडट निखिल मुधोळकर व त्यांचे 25 अधिकारी व जवान, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ), नागपूरचे श्री.बादल व त्यांचे 4 अधिकारी, राज्य आपत्ती प्रतिस...