झाडांचे संगोपन करुन ती झाडे जगविणे आवश्यक-- जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले

झाडांचे संगोपन करुन ती झाडे जगविणे आवश्यक -- जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले अलिबाग दि.29:- (जिमाका) रायगड जिल्ह्याला झाडे लावण्याचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करणे व लावलेल्या झाडांचे संगोपन करुन ती झाडे जास्तीत जास्त प्रमाणात जगवावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित 50 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचा वर्षनिहाय नियोजन आराखडा व कृती कार्यक्रम तयार करुन अंमलबजावणी करणे याबाबतच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होत्या. या बैठकीला रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर, अपर ...