रायगड जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रा रथास जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी हिरवा झेंडा दाखवून केले मार्गस्थ
रायगड दि.23(जिमाका):- भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचा लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यत वेळेत पोहोचावेत याची खात्री करण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून आखण्यात आली असून ही यात्रा दि.15 नोव्हेंबर ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत पार पडणार आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने विकसित भारत संकल्प यात्रा योजनेच्या रथाला आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के आदींसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. विविध योजनांतर्गत पात्र असलेल्या परंतु आतापर्यत लाभ न घेतलेल्या लोकांपर्यत पोहोचणे, माहितीचा प्रसार आणि योजनांबद्दल जागरुकता निर्माण करणे, नागरिकांशी संवाद वैयक्तिक कथा/अनुभव शेअरिंगद्वारे सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणे, यात्रेदरम्यान निश्चित केलेल्या तपशीलांद्वारे संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी करणे ही विक