Posts

Showing posts from September 29, 2024

किहीम येथे महा श्रमदान मोहीम कार्यक्रम संपन्न

    रायगड(जिमाका)दि.01:-  स्वच्छता ही सेवा अभियान  अंतर्गत  जिल्ह्यात  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड व उप मुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता विभाग श्रीमती शुभांगी नाखले  यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून स्वच्छतेचे विविध उपक्रम होत आहेत. स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता या बाबिस अनुसरून ग्रामपंचायत किहीम ता.अलिबाग येथे ग्रामस्थ, एन.एस.एस चे विद्यार्थी, लायन्स क्लबचे सदस्य व माणुसकी प्रतिष्ठानचे सदस्य, रायगड जिल्हा परिषदेचे अधिकारी  व कर्मचारी यांच्यासंयुक्त विद्यमाने महाश्रमदान मोहीम उत्साहात संपन्न झाली.            यावेळी किहिमचे सरपंच शांत गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले प्रत्येकाने स्वच्छता सवयी अंगी कारून आपले घर,परिसर गाव स्वच्छ ठेण्यास कायमस्वरूपी  प्रयत्न करावा. किहीम ग्रामपंचायत हद्दीत स्वच्छता राहण्यासाठी किहीम ग्रामपंचायत सतत कार्यरत असते. स्वच्छता अभियानामुळे आरोग्य मान उंचावून सर्वांची प्रगती होणार आहे. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड म्हणाले स्वच्छता प्रेमी नागरिक विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करतील. विद्यार्थी  स्वच्छता अभियानात महत्वा

जिल्ह्यात सण,उत्सव कालावधीकरिता मनाई आदेश जारी

  रायगड(जिमाका)दि.01:-  रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रामध्ये खालापूर, खोपोली, रसायनी, रोहा, माणगांव, महाड, नागोठणे, अलिबाग या ठिकाणी मोठया प्रमाणावर औद्योगिक कारखाने असून औद्योगिक कंपन्यांमध्ये कामगार संघटनांकडून आपल्या विविध मागण्यांसाठी अचानक संप व आंदोलन पुकारण्यात येत असतात त्यामुळे अनेक वेळा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतो. रायगड जिल्ह्यामध्ये बहुतांशी गांवामध्ये हिंदु-मुस्लिम बौध्द तसेच इतर धर्मीयांची मिश्रवस्ती असल्याने अधुन मधुन वैयक्तिक कारणांमुळे पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये हिंदू-मुस्लिम हा माहीती कार्यालय युक्तीमध्ये जातीय तणावाच्या घडना घडून दखलपात्र व अदखलपात्र गुन्हे घडण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे देखील हिंदू-मुस्लिम जातीय तणावाची परिस्थिती निर्माण होत आहे. दि.25 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटना यांच्यावतीने श्रीमती रूपाली नाकाडे, अध्यक्ष अमेदा या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हा स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देवून सर्व कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांना कायमस्वरूपी सेवेत

काजू बी शासन अनुदान योजनेसाठी अर्ज करण्यास दि.31 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ

    रायगड(जिमाका)दि.01:-   राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बी साठी शासनाकडून वित्तिय सहाय्य उपलब्ध करुन दिल्यास, काजू उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्यास मदत होईल, ही बाब विचारात घेवून सन 2024 च्या काजु हंगामासाठी काजू उत्पादनाकरिता शासनाने राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजू बी शासन अनुदान योजना कार्यान्वीत केली होती.  या योजनेसाठी अर्ज सादर करावयाची मुदत दि.31 ऑक्टोबर 2024 पर्यंत वाढविण्यात आली असून अनुदान योजनेचा लाभ राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य काजू मंडळ तथा कार्यकारी संचालक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ संजय कदम यांनी केले आहे. राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बी साठी शासन अनुदान देणे या योजनेची अंमलबजावणी बाबतची प्रक्रिया पणन मंडळाच्या  www.msamb.com  या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अनुदान मागणीसाठी विहीत नमुन्यातील अर्ज, संमतीपत्र, 7/12, कृषी खात्याचा दाखला, जी.एस.टी.बील, बँक तपशिल, आधारकार्ड, हमीपत्र इ. कागदपत्रे अनुदान मागणीसाठी आवश्यक आहेत. अधिक माहीतीसाठी इच्छुक काजू उत्पादक