पालकमंत्री प्रकाश महेता यांचा रायगड जिल्हा दौरा
अलिबाग दि.11 (जिमाका) गृहनिर्माण मंत्री तथा पालकमंत्री रायगड जिल्हा मा.ना.प्रकाश महेता हे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार दि.14 ऑगस्ट, 2017 रोजी सायंकाळी 6.00 वा. घाटकोपर मुंबई येथून अलिबाग, जि.रायगड कडे प्रयाण. रात्रौ 9.00 वा. शासकीय विश्रामगृह अलिबाग येथे आगमन व मुक्काम. मंगळवार दि. 15 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 8.50 वा. शासकीय विश्रामगृह येथून पोलीस परेड ग्राऊंड अलिबागकडे प्रयाण. 8.55 वा. पोलीस परेड ग्राऊंड येथे आगमन. 9.05 वा. भारतीय स्वातंत्र्याच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती. 10.00 वा.रायगड जिल्ह्यातील गणेशोत्सवानिमित्त करावयाच्या उपाययोजना, जिल्हा शांतता समिती बैठक, कायदा व सुव्यवस्था आणि विभागप्रमुखांची आढावा बैठक, रायगड जिल्ह्यातील सर्व कंपनी व्यवस्थापनाच्या प्रतिनिधी समवेत बैठक. (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग.) दुपारी 12.00 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथून शा...