माणगाव ग्रामीण रुग्णालयात डिजिटल क्ष-किरण यंत्राचे पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते वितरण

अलिबाग,जि. रायगड दि.15 (जिमाका):- माणगाव ग्रामीण रुग्णालयात पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते डिजिटल क्ष-किरण यंत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर, माणगाव तहसिलदार प्रियंका कांबळे-आयरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रदीप इंगोले, डॉ.डोईफोडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.परदेशी, श्री.सुभाष केकाणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री.राऊत, माणगाव ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सेस व तेथील अन्य कर्मचारी उपस्थित होते. ००००००