जिल्हा परिषदेत अध्यक्षा योगिता पारधी यांच्या हस्ते "महिला व बालविकास भवनाचे " उद्घाटन संपन्न
अलिबाग,जि. रायगड दि.15 (जिमाका):- रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील
महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयामध्ये जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी , सभापती गिता
जाधव व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील
यांच्या हस्ते "महिला व बालविकास भवनाचे " उद्घाटन आज करण्यात आले.
या प्रसंगी महिला
व बालविकास भवनातील जिल्हा परिविक्षा अधिकारी श्रीमती एस.एस. वाघमारे , महिला आर्थिक
महामंडळाच्या कॅम्प मॅनेजर श्रीमती शमीम चौधरी व महिला आयोग प्रतिनिधी ॲड. शितल ठाकूर
उपस्थित होते.
रायगड जिल्हा
परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामध्ये "महिला व बालविकास भवन "
आजपासून कार्यान्वित करण्यात आले आहे, अशी माहिती महिला व बालविकास अधिकारी
श्री.मंडलिक यांनी दिली आहे.
०००००
Comments
Post a Comment